सिद्धक्षेत्र कुंथलगिरी
सिद्धक्षेत्र कुंथलगिरी
श्री कुलभूषण- देशभूषण मुनींची जीवन गाथा मनाला चुटपुट लावून जाते. कितीही वेळा त्यांचे जीवन-चरित्र वाचले किंवा ऐकले तरीही मनाची तृप्ती हॊत नाही. तिचा अवीट आस्वाद घेण्यास मन पुनः पुनः आतुर असते...
सुमारे साडेबारा लाख वर्षांपूर्वी जैनांचे विसावे तीर्थंकर मुनिसुव्रतनाथ भगवंतांच्या काळात भ. कुलभूषण-देशभूषण होऊन गेले. हे दोघे राजपुत्र होते. परंतु जीवनातील एका घटनेमुळे त्या दोघांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आला. त्यांनी भगवती जिनदीक्षा धारण करून सन्यस्त जीवन स्वीकारले. या सन्यस्त जीवनामध्ये विहार करीत करीत ते दक्षिण भारतात आले. त्यांनी दक्षिण भारतात जेथे घनदाट वंशीवन (वेळूचे वन ) पसरले होते, त्या वंशस्थलवनात प्रवेश केला. त्या वंशीवनात एक ऊंचच ऊंच पहाड आहे. ज्याला "वंशस्थलगिरी" म्हणत असत, त्याला आज आपण "कुंथलगिरी" म्हणून ओळखतो. छोट्या छोट्या डोंगर दऱ्यांच्या घनदाट वृक्षराजींच्या माथ्यावर आहे, ऊंचच ऊंच पहाड. हे अत्यंत रमणीय आणि शांत स्थान होते. या पहाडावर या बंधुद्वयाने, मुनिश्री कुलभूषण- देशभूषण यांनी घोर तपश्चर्या करून सिद्धगती प्राप्त केली. मोक्षगती मिळवली, म्हणून हा वंशस्थलगिरी सिद्धक्षेत्र बनले. जैन बांधवांसाठी हे सिद्धक्षेत्र दक्षिणेतील "सम्मेद-शिखरजी" आहे.
साधारणपणे साढे चारशे वर्षांपूर्वी पद्मपुराणातील वंशस्थलगिरीचा संदर्भ लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील "पेटाशा" नामक एक व्यक्ती पायी प्रवास करीत मार्गातील अनेक अडचणी संकटाना सामोरे जात मोठ्या भक्तिभावाने येथे येऊन पोहोचला. भ. देशभूषण - कुलभूषण मुनींच्या चरण चिन्हांच्या दर्शनाची आत्यंतिक ओढ, त्याच्या ठायी असलेली असीम भक्ती हीच "पेटाशा" ची मोठी शक्ती होती. ते येथे आले तेव्हा येथे वेळूचे घनदाट जंगल पसरले होते. राहण्याची सुविधा नव्हती त्यामुळे ते जवळच्या रामकुंड नावाच्या वस्तीत राहिले.
"पेटाशा" भ. कुलभूषण - देशभूषणांच्या निर्वाण स्थलीच्या जवळ येऊन पोहोचला पण ज्या कारण चिन्हांच्या दर्शनार्थ मन अधीर होते, अत्यंत बेचैन होते, ते अद्याप घडत नव्हते. यासाठी पेटाशा रोज सकाळी उठून चरण चिन्हांच्या दर्शनार्थ शोध घेत जंगलात सर्वत्र फिरत असे. दीड - दोन महिने झाले जवळची पुंजी संपत आली आता काय करावे या विचाराने ग्रासला असताना एके रात्री त्याचा डोळा लागला असताना पहाटे त्यांना दृष्टांत झाला ... "या गावाच्या पश्चिम दिशेस एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक पांढरी गाय आपल्या पांढऱ्या वासराला दूध पाजत असेल, तेथेच दुधाने जमीन भिजलेली दिसेल तेथे तू जमीन खोदून बघ, त्या ठिकाणी भ. देशभूषण - कुलभूषण यांच्या चरण चिन्हांचे दर्शन होईल " त्यावर ते त्वरित काही माणसांना घेऊन जंगलातून / झाडीतून वाट काढीत पहाडावर पोहोचले, दृष्टांत प्रमाणे त्यांनी ती ओलसर जमीन खोदली असता त्यांना चरण चिन्हांच्या जोडीचे दर्शन झाले. पेटाशाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. गावकऱ्यांच्या साहाय्याने त्यांनी एक छोटीशी घुमटी बांधली होती. जैन बांधव तेव्हांपासून दर्शनास येत राहिले, पण तुरळकच.
कुंथलगिरी हे क्षेत्र पूर्वी निजामाच्या राजवटीत येत होते. त्यामुळे क्षेत्रावर यात्रेकरूंची फारशी वर्दळ नव्हती, पहाडावर श्री कुलभूषण - देशभूषण भगवंतांच्या पादुका (चरण ) होत्या पण त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था नव्हती. जनावरांचा, गुराख्यांचा तेथे वावर होता... चरण चिन्हांची अवहेलना, अविनय होत होता... त्यांचे पवित्र राखले जात नव्हते. अशी दुरावस्था पाहून दर्शनार्थी अतिशय दुःखी होत असत. त्यांना वाटे पहाड जैनांच्या ताब्यात असावा... त्यावेळी लातूरमध्ये भट्टारक विशालकीर्ती महाराज होते... त्याच्याकडे जाऊन जैन समाजातील प्रमुखांनी विनंती केली की, हा पहाड आपण ताब्यात घ्यावा आणि त्याची व्यवस्था पाहावी, त्याची देखभाल करावी " पण भट्टारक महाराजांनी आपली असमर्थता प्रकट केली.
असेच एकदा परांडा येथील शेठ रामचंद्र गिरीधर शाह कुंथलगिरी येथे दर्शनाला गेले असता पहाडावर भगवंताच्या चरण चिन्हांची पूजा करीत होते. आजूबाजूला गुराखी मुले फिरत होती. पूजा झाल्यावर चढवलेले, अर्पण केलेले द्रव्य तेच घेत असत. पण यावेळी विपरीत घडले. नेमके एका गुराख्याने ते द्रव्य मध्येच हात घालून उचलले. शेठजी क्षुब्ध झाले. त्यांची व गुराख्यांची बोलाचाली झाली त्यावर शेठजीने निश्चय केला की हे स्थान, हा परिसर, ही जागा आपण आपल्या जैन बांधवांसाठी घेतला पाहिजे.
शेठ रामचंद्र यांचे निजाम दरबारी चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांना तो डोंगर व आजूबाजूची जागा विकत घेता आली. शेठ रामचंद्र परांडकर डोंगर व आजूबाजूची जागा खरेदी करून थांबले नाहीत तर त्यांनी या क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भरपूर कामे सुरु केली. पहाड व पायथ्याशीही कायापालट करावयाचे ठरवले. त्या पहाडावर त्यांनी प्रथम तीर्थांकर भ. आदिनाथ (वृषभनाथ) मंदिर बांधून इ. स. १८७४-७५ ला त्या मंदिरातील मुलनायक भ. वृषभनाथांची मूर्ती व अन्य अनेक मूर्तींची प्रतिष्ठापना केली. ही मूर्तीची, मंदिराची प्रतिष्ठा मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ला झाली. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला ध्वजा चढवली आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला रथयात्रा, पालखी काढली. त्यावेळी पासून आजूबाजूच्या परिसरातून हजारो भाविक मोठ्या भक्ती भावाने रथोत्सवासाठी, यात्रेसाठी येत असतात. तीन चार दिवस राहून मनमुराद पूजा भक्ती करतात. पौराणिक कथा - कीर्तनात, सांस्कृतिक कार्यक्रमात रंगून जातात. त्याकाळचे निजाम स्टेट मधील हे पहिले शिखरबद्ध मंदिर आहे. कुंथलगिरी येथील यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, चतुर्दशी, व पौर्णिमेला भरते.

"वंशस्थळ वनके ढिग होय, पश्चिम दिशा कुंथुगिरी सोय ।
कुलभूषण - देशभूषण नाम, तिनके चरणांनी करुं प्रणाम ।।"
कुंथलगिरी येथे जाण्यासाठी भूम येथून किंवा औरंगाबाद - बार्शी महामार्गा वरील सरमकुंडी फाटा येथून बस मिळतात.